पिण्याच्या पाण्यात आढळले जीवजंतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:20 IST2017-09-07T00:20:52+5:302017-09-07T00:20:58+5:30
आरोग्यास धोका; पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटीमागील नागरी वसाहतीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळातून येणाºया पाण्यात चक्क गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ही परिस्थिती असून, मनपा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पिण्याच्या पाण्यात आढळले जीवजंतू
आरोग्यास धोका; पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटीमागील नागरी वसाहतीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळातून येणाºया पाण्यात चक्क गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ही परिस्थिती असून, मनपा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही भागात अजूनही गढूळ तसेच दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच नागरी वसाहतीत असलेल्या परिसरात आता पिण्याच्या पाण्याच्या नळातून थेट गांडूळ येत असल्याने नळाचे पाणी प्यावे की नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
नळाला येणाºया पाण्यात कधी बारीक अळ्या तर कधी किडे निघायचे. आता तर थेट गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने परिसरातील जलवाहिन्यांची तत्काळ तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.