दुचाकींची समोरासमोर धडक; पळसविहीरचा युवक ठार

By Admin | Updated: December 21, 2015 00:15 IST2015-12-21T00:12:22+5:302015-12-21T00:15:17+5:30

तवली फाट्यावरील घटना : पितापुत्र गंभीर जखमी

Bikers face face-to-face; The young man of Palasvir killed | दुचाकींची समोरासमोर धडक; पळसविहीरचा युवक ठार

दुचाकींची समोरासमोर धडक; पळसविहीरचा युवक ठार

नाशिक : पेठ रस्त्यावरील तवली फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला़ या अपघातात दिंडोरी तालुक्यातील पळसविहीरचा युवराज मोहन भोये (२७, रा़३७९, जनता विद्यालय, पळसविहीर) याचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या दुचाकीवरील भुसारे पितापुत्र गंभीर जखमी झाले आहेत़
पंचवटी पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पळसविहिरी येथील युवराज भोये हे रविवारी नाशिक - पेठ रस्त्यावरून दुचाकीने (एमएच १५ एफबी ८३९८) पेठकडे जात होते, तर मकरंद देवराम भुसारे व त्यांचे वडील देवराम भुसारे (दोघेही रा़ तेजस अपार्टमेंट, आकाश पेट्रोलपंपासमोर, दिंडोरीरोड) हे दुचाकीने (एमएच १५, ईएल ८६१३) पेठकडून नाशिककडे येत होते़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तवली फाट्याजवळील साई भगवंत नर्सरीसमोर या दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात झाला़ या अपघातामध्ये युवराज भोये यांच्या डोक्यास तर मकरंद व देवराम भुसारे पितापुत्रही जबर जखमी झाले़ या तिघांनाही उपचारासाठी पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ त्यामध्ये उपचार सुरू असताना युवराज भोये यांचा मृत्यू झाला, तर भुसारे पितापुत्रांवर उपचार सुरू आहेत़

Web Title: Bikers face face-to-face; The young man of Palasvir killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.