दुचाकींची समोरासमोर धडक; चालक ठार
By Admin | Updated: September 20, 2015 22:51 IST2015-09-20T22:50:47+5:302015-09-20T22:51:20+5:30
दुचाकींची समोरासमोर धडक; चालक ठार

दुचाकींची समोरासमोर धडक; चालक ठार
मालेगाव : तालुक्यातील टाकळी रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने वाके फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी दिलीप दगा शेवाळे (रा. टाकळी) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भारत नानाजी अहिरे (२४) यांनी काल दुपारी फिर्याद दिली.
गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दिलीप शेवाळे आपल्या दुचाकीवरून टाकळी गावाकडून वाके फाट्याकडे लोखंडी बफर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या नितीन भगवान खैरनार याच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार मोरे करत आहेत. (प्रतिनिधी)