शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने इसमाचा कापला गळा;पडले सात टाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:31 IST

नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देशहरातील तीसरी दुर्घटनासोशलमिडियावरुन नायलॉन मांजा न वापरण्याचे साकडे१३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे

नाशिक : शहर व परिसरात नायलॉन मांजाने पक्ष्यांसोबत माणसेदेखील जखमी होण्याच्या घटना घडू लागल्या आहे. मखमलाबादरोडवरील दुचाकीस्वार युवती जखमी होण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इंदिरानगर भागात एका चाळीशीच्या इसमाच्या गळ्याभोवती नायलॉन मांजाचा फास लागून गंभीर दुखापत झाली. त्यांचे दैव बलवत्तर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिक शहरातील ही तीसरी दुर्घटना आहे.याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरानगर भागातील रहिवासी मयुर कुलकर्णी (३५) हे कामानिमित्त दुचाकीने जात असताना इंदिरानगरमध्ये त्यांच्या गळ्याभोवती हवेतून तुटून आलेला नायलॉनचा मांजा घासला जाऊन दुखापत झाली. त्यांनी वेळीच त्यांची दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत तत्काळ कुलकर्णी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मांजामुळे गळ्याची त्वचा कापली गेल्याने त्यांना सात टाके पडले. सुदैवाने त्यांचे या दुर्घटनेत प्राण वाचले. नायलॉन माजांचा वापर त्वरित थांबविला जाणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटनांना आळा घालणे शक्य होणार नाही.नायलॉन मांजा हा नाशिकरांसाठी कर्दनकाळ ठरु लागला आहे. तीन दिवसांपुर्वीच मखमलाबादरोडवरील हनुमानवाडी कॉर्नरच्या सिग्नलवर एका दुचाकीस्वार युवतीच्या गळ्याला नायलॉन मांजाने दुखापत झाली. त्याअगोदर द्वारका येथे दुचाकीस्वार भारती जाधव नामक महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच या आठवडभरात शहरात अद्याप दहा पक्षी नायलॉन मांजाच्या फासामध्ये अडकून विविध ठिकाणी झाडांच्या फांद्यावर तडफडत होते, त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत सुटका केली.सोशलमिडियावरुन नायलॉन मांजा न वापरण्याचे साकडेनायलॉन मांजाचा वापर करु नये, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा, यासाठी सामाजिक, राजकीय पर्यावरणप्रेमी संघटनांकडून जनप्रबोधन केले जात आहे. शहरातील सोशलमिडियावर यासंबंधीचे विविध पोस्ट, छायाचित्रे व्हायरल होऊ लागले आहे. नायलॉन मांजाचा वापर हा सजीवसृष्टीकरिता घातक असून हा वापर थांबवावा, याकरिता नाशिककरांना साकडे घातले जात आहे.नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे. चोरट्या मार्गाने होत असलेली नायलॉन मांजाची विक्री थांबवून संबंधित विक्रेत्यांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरु लागली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयHealthआरोग्यAccidentअपघात