ओझरनजीक कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: September 14, 2016 22:05 IST2016-09-14T21:51:38+5:302016-09-14T22:05:50+5:30
ओझरनजीक कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

ओझरनजीक कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई -आग्रा महामार्गावर असलेल्या तिलकनगर बसथांब्याजवळ मारुती कारने दुचाकीला दिलेल्या धडकेने युवक ठार झाला.
सचिन गौतम हिरे (२४, रा. पिंपळगाव बसवंत) हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ एफडी २२५६) नाशिकहून पिंपळगावकडे जात असताना त्याच सुमारास पिंपळगावकडे जाणाऱ्या कारने (एमएच १५ सीटी ६२३०) दुचाकीच्या मागील बाजूला धडक
दिल्याने झालेल्या अपघातात हिरे ठार झाले.
याबाबत ओझर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास
पोलीस निरीक्षक श्रीहरी
बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन. सी. माळोदे करीत आहेत.
जुगार खेळताना पकडले
येथील ओपनएअर थिएटर जवळील वसाहतीमाग तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ओझर पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडून त्यांच्या जवळून ११ हजार ६०० रुपये रोख व दोन मोटारसायकल असा ४४ हजार ६०० रु पयांचा ऐवज जप्त केला.
त्यामध्ये जनार्दन बोराडे,
मोहन संसारे, राहुल जोशी, विजय उइके, माधव जाधव, सचिन
घुगे, गोविंद कोसे, सोमनाथ
जाधव, सुधीर राजगिरे, चेतन भुले यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांना जामिनावर सोडण्यात आले. (वार्ताहर)