संगमेश्वरातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST2020-12-09T04:11:58+5:302020-12-09T04:11:58+5:30

---- सामाईक विहिरीवरून हाणामारी मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे गेल्या सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सामाईक विहिरीवरील हक्कावरून वाद ...

Bike theft from Sangameshwar | संगमेश्वरातून दुचाकी चोरी

संगमेश्वरातून दुचाकी चोरी

----

सामाईक विहिरीवरून हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे गेल्या सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सामाईक विहिरीवरील हक्कावरून वाद होऊन हाणामारी झाली. अरुण उत्तम खैरनार, रा. निमगाव यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सुभाष उत्तम खैरनार, सूरज सुभाष खैरनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी व आरोपी हे भाऊबंद असून, फिर्यादीने आपल्या वाट्याची शेतजमीन दुसऱ्यास विकूण टाकली. आरोपी फिर्यादीस म्हणाले, तुम्ही शेती विकली, विहिरीमध्ये तुमचा हक्क नाही. विहिरीवर आले तर बेत पाहू, असा दम दिला. फिर्यादी हे समजावून सांगत असताना आरोपींनी लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

-----

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील भायगाव शिवारातील विहिरीत जालिंदर विश्वास कुंवर (२९, रा. इंदिरानगर) याने सोमवारी रात्री रागाच्या भरात उडी घेतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. चंद्रकांत अहिरे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

-----

Web Title: Bike theft from Sangameshwar