शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची हेल्मेटसह दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:02 IST

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर्शन व मिरणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थेच्या हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला होता.

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर्शन व मिरणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थेच्या हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला होता.निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी आणि अंबड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या उपस्थित रोबोटद्वारे ध्वज फडकावून चित्ररथाचे औपचारिक उद््घाटनानंतर हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त अशोक मर्चंट, समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, विश्वस्त डॉ. के. एन. नांदुरकर, प्रा. एम. बी. झाडे आदी उपस्थित होते. या रथयात्रेत संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांतील आठ चित्ररथांनी सहभाग घेतला. भाऊसाहेबनगरच्या गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या मुलींनी ढोल आणि लेजीम पथकाने मिरवणुकीने शोभा वाढविली. संस्थेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. ललित महाविद्यालयाचा नटराजाचे चित्रण, कृषी महाविद्यालयाचे शेती तंत्रज्ञानातील उपकरणे आकर्षणाचा विषय ठरले. या मिरणुकीत शहर वाहतूक पोलीस रथाचाही समावेश करण्यात आला होता.इलेक्ट्रॉनिक वाहनांची प्रात्यक्षिकेरथयात्रेत संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांतील आठ चित्ररथांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दुचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वाहने यांचे उत्तमनगर, पवननगर आणि त्रिमूर्ती चौकात प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या या चित्ररथांच्या मिरवणुकीत हजारो महिलांनी दुचाकींसह हेल्मेटचा वापर करीत सहभाग घेत सर्वांनी आपल्या सुरक्षेसाठी हेल्मट वापरण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक