शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घंटागाडी कामगारांची बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:22+5:302021-02-05T05:42:22+5:30
केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि महाराष्ट्रातही सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी हे ...

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घंटागाडी कामगारांची बाईक रॅली
केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि महाराष्ट्रातही सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कृषी कायद्याबरोबरच शेतमालाला हमी भाव द्यावा, कामगारविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ही आंदोलने करण्यात आली.
सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली. यावेळी कृषी कायदे रद्द केलेच पाहिजे, हमी भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन मागण्यांचे फलक घेऊन ही रॅली गंजमाळ, व्दारका, आम्रपाली नगर, नारायणबापू नगर, सैलानी चौक, शिवाजी नगर, बिटको चौक अशा विविध मार्गाने या रॅलीचा नाशिक रोड येथे समारोप करण्यात आला. यावेळी कॉ. राजू देसले, संघटनेचे नेते महादेव खुडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते शशिकांत उनव्हणे यांनी मनोगत व्यक्त व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली.
आंदोलनात विठ्ठल शिंदे, शिवनाथ जाधव, रफिक सय्यद, कैलास मोरे, लोटन मराठे, नाना नवर, शरद अहिरे, नितीन सोनकांबळे यांच्यासह अन्य घंटागाडी कामगार सहभागी झाले होते.
--
छायाचित्र आर फोटोवर २७ बाईक रॅली... केंद्र शासनाच्या कृषीविरोधी कायद्यांना विराेध करणाऱ्या दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरात श्रमिक सेवा संघाच्या वतीने घंटागाडी कामगारांची बाईक रॅली काढण्यात आली.