नाशिकमध्ये जुन्या पेंशन योजनेसाठी बाईक रॅली; हजारो कर्मचारी सहभागी

By Suyog.joshi | Published: February 27, 2024 02:58 PM2024-02-27T14:58:27+5:302024-02-27T14:58:41+5:30

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या 'वोट फॉर ओपीएस पेन्शन' संकल्प यात्रेत सहभागी झाले.

Bike Rally for Old Pension Yojana in Nashik; Thousands of employees participated | नाशिकमध्ये जुन्या पेंशन योजनेसाठी बाईक रॅली; हजारो कर्मचारी सहभागी

नाशिकमध्ये जुन्या पेंशन योजनेसाठी बाईक रॅली; हजारो कर्मचारी सहभागी

नाशिक - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने नाशिक शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. राज्य सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्यभरातून लाखो कर्मचारी करत आहेत.

नागपूरपासून सुरू झालेली पेन्शन संकल्प यात्रा अमरावती, वाशिम, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, जिल्ह्यातील सिंदखेड राजा मार्गे जालना व आज छत्रपती संभाजीनगर,पुणे,नगर मार्गे नाशिक येथे पोहोचली आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या 'वोट फॉर ओपीएस पेन्शन' संकल्प यात्रेत सहभागी झाले.

नाशिक येथील आयोजनासाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गगे,पृथ्वीराज राठोड,अमोल पाटील,प्रमोद क्षीरसागर,अनिल सांगळे,दिलीप बेडकोळी,सोपान भोईर व जिल्हा कार्यकारिणीसह विजय बडे,संतोष शार्दुल, त्रिलोचन कटरे,शब्बीर शेखधर्मराज मोरे.जगन्नाथ पवार,सुभाष उगले,आनंदा मोरे, शत्रुघ्न उबरहंडे ,रामेश्वर शेंडगे, काकासाहेब कवडे सचिन कोकाटे,किसन दडस ,दत्ता चौरे,नाना पेहरे, गोविंद उगले आदींनी परिश्रम घेतले.

जीपीएस योजना अमान्य
महाराष्ट्र सरकार तथाकथित जीपीएस योजना आणू पाहात आहे, परंतु आम्हाला कर्मचाऱ्यांच्या हिताशी तडजोड कधीही जमणार नाही. एमपीएस नको, एनपीएस, जीपीएस, डीसीपीएस अशा कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कधी कदापि मान्य होणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितले.

Web Title: Bike Rally for Old Pension Yojana in Nashik; Thousands of employees participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.