द्राक्ष, कांद्याचे सर्वाधिक नुकसान : प्रधान सचिव येणार
By Admin | Updated: November 18, 2014 00:32 IST2014-11-17T23:28:52+5:302014-11-18T00:32:44+5:30
सतरा हजार हेक्टरवरील पिके बाधित

द्राक्ष, कांद्याचे सर्वाधिक नुकसान : प्रधान सचिव येणार
नाशिक : वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जिल्'ात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे सुमारे १७ हजार हेक्टरवरील शेती पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, नुकसानीचा निश्चित आकडा शोधण्यासाठी तलाठ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्'ात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रविवारी सायंकाळी तर धुवॉँधार बरसून पावसाने दाणाफाण उडविली, जवळपास दोन तास कोसळलेल्या या पावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत. विशेष करून द्राक्ष, डाळिंब व खळ्यात काढून ठेवलेल्या कांद्याला याची मोठ्या प्रमाणात झळ बसून शेतकरी उद््ध्वस्त झाला आहे. त्याच बरोबर कापणीवर आलेल्या भात व नागली पिकांचीही नासधूस झाल्याने विशेष करून आदिवासी भागातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतरच नुकसानीचा निश्चित अंदाज बांधण्यात येणार आहे. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्'ात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्राधन सचिव श्रीकांत सिंह बुधवारी नाशिक जिल्'ाच्या दौऱ्यावर येत आहेत. सिन्नर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुपारी १२ वाजता सर्व महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा ते दौऱ्यावर जातील.