मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार

By Admin | Updated: April 17, 2016 23:59 IST2016-04-17T23:13:06+5:302016-04-17T23:59:09+5:30

माधुरी भदाणे सन्मानित : आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

Big Rajwada Samaj Bhushan Award | मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार

मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार

नाशिक : मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार समितीमार्फत देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार मराठा सेवा संघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी भदाणे यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात राजवाडा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विशेष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध क्षेत्रातील कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी निवड समितीकडून विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. समितीकडे ७० प्रस्ताव दाखल झाले होते. माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीचे अध्यक्ष विनोद बर्वे पदाधिकारी अमित गांगुर्डे, नीलेश बर्वे, रोहित काळे, अक्षय साबळे, बॉबी साळवे, किशोर काळे या सर्व सदस्यांनी भदाणे यांची निवड केली.
यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यास महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त जगन्नाथन, आमदार देवयानी फरांदे, पोलीस उपायुक्त अंबिका, पुरस्कार समितीचे विनोद बर्वे यांच्या हस्ते भदाणे यांना मानपत्र, मानचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सलीम शेख, शिक्षण सभापती संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे, आनंद सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेवक यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Big Rajwada Samaj Bhushan Award