शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:09 IST

सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे.

ठळक मुद्देकापडी चादरवरील अनावश्यक खर्च भाविकांना टाळावाभद्रकाली पोलिसांकडून चादर अर्पण

नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणूका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.जुन्या नाशिकमधील पिंजारघाट येथील हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याच्या परिसरात सायंकाळी उरूस भरत आहेत. यात्रेत सहभागी होताना भाविकांनी कापडी चादरऐवजी फुलांच्या चादरी मजारशरीफवर अर्पण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विश्वस्तांकडून करण्यात आले आहे. कापडी चादरवरील अनावश्यक खर्च भाविकांना टाळावा, त्याऐवजी गोरगरीबांना मदतीचा हात द्यावा, हा यामागील उद्देश्य असल्याने विश्वस्तांनी सांगितले.बडी दर्गा उरूस हा दरवर्षाचे भाविकांचे तसेच बाळगोपाळांचे आकर्षण असते. उरूसमध्ये मिळणारा ‘फालुदा’ हे शितपेय लोकप्रिय आहे. नाशिकसह मुंबईहून फालुदाविक्रेते यात्रेत दुकाने थाटतात. तसेच जुने नाशिक भागातील एकमेव जुनी यात्रा म्हणूनही यात्रेची ओळख आहे. हिंदू-मुस्लीम भाविक मोठ्या उत्साहात बडी दर्ग्याच्या यात्रेत हजेरी लावतात. यावर्षी दर्ग्याच्या आवारात सिमेंट कॉँक्रीट करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात गैरसोय कमी झाली आहे; मात्र दर्गा परिसराचे विकासकाम संथगतीने सुरू राहिल्याने यंदा अर्धवट स्थितीतील बांधकामाची अडचण यात्रेत जाणवत आहे.जुने नाशिकसह शहर व परिसरातील मित्रमंडळांनी संदलच्या मिरवणूका ढोल-ताशांच्या गजरात बडी दर्गाच्या आवारात आणू नये. त्याऐवजी पारंपरिक पध्दतीने डोक्यावर चादर, प्रसादाचे ताट ठेवून दरूदोसलाम, नात-ए-रसूल, मनकबत चे पठण करत यावे. जेणेकरून कुठल्याहीप्रकारचा बेशिस्तपणा यात्रेत होणार नाही, असे विश्वस्तांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. यात्रोत्सवाची सांगता रविवारी (दि.२३) होणार आहे. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भद्रकाली पोलिसांकडून चादर अर्पणसालाबादप्रमाणे यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहिली चादर बडी दर्ग्यामधील मजारवर चढविण्याचा मान वर्षानुवर्षांपासून भद्रकाली पोलिसांना दिला जातो. यावर्षीही प्रथा पाळण्यात आली. पोलिसांकडून विधिवत डफलीच्या निनादाने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीत पारंपरिक पध्दतीने कव्वाली, नातचे पठण करण्यासाठी ‘मिलाद पार्टी’ला सहभागी करून घेण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.१२) सायंकाळी उपस्थित राहून बाबांच्या मजारवर चादर अर्पण केली.---

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिकFairजत्रा