विडी कामगारांचा गुरुवारी मेळावा
By Admin | Updated: December 4, 2015 21:55 IST2015-12-04T21:55:08+5:302015-12-04T21:55:44+5:30
विडी कामगारांचा गुरुवारी मेळावा

विडी कामगारांचा गुरुवारी मेळावा
सिन्नर : ईपीएफ १९९५चे सर्व पेन्शनर व विडी कामगारांच्या मेळाव्याचे येत्या गुरुवारी (दि. १०) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दत्ता निकम, नारायण आडणे यांनी दिली.
कामगारांना बऱ्याच वर्षांच्या परिश्रमानंतर ईपीएफ १९९५ चा पेन्शन कायदा लागू झाला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फारच कमी पेन्शन मिळत होती. तीन-चार वर्षांच्या चळवळीनंतर कायद्यात सुधारणा होऊन अलीकडे एक हजार रुपये पेन्शन झाली आहे. त्यामध्ये बऱ्याच पेन्शनरची वाढच झाली नाही, काहींच्या वारसाची नोंद नाही, दोन वर्षांचा फरक नाही, वेळेवर निवृत्तिवेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही आदिंसह विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तालुका विडी
कामगार संघाच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी १ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आडणे यांनी केले आहे. (वार्ताहर)
नाशिक : नागजी चौक परिसरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने पाठ आणि मणकेदुखीसारख्या आजारात वाढ होत असून, अनेक वाहनांचे स्पेअरपार्टदेखील निकामी
होत आहेत.