बसचालकाला मारहाण

By Admin | Updated: December 22, 2015 23:40 IST2015-12-22T23:38:15+5:302015-12-22T23:40:05+5:30

पंचवटीतील प्रकार : ट्रॅव्हल कंपनीच्या कामगारांची अरेरावी

Bicycling | बसचालकाला मारहाण

बसचालकाला मारहाण

पंचवटी : रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे येणाऱ्या बसचा एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कारला धक्का लागल्याने त्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या चालकाला मारहाण केल्याची घटना मालेगाव स्टॅण्डवर सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमाराला घडली. काही दिवसांपूर्वीच आगारात घुसून टोळक्याने कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यापाठोपाठ ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर अपघातग्रस्त वाहने पंचवटी पोलीस ठाण्यात आणली त्यावेळी पोलिसांनी वाहनांचे नुकसान झाले असल्यास तक्रार द्या असे सांगताच त्या एसटी चालक व कारचालकाने काढता पाय घेतला. याबाबत माहिती अशी की एसटी मालेगाव स्टॅन्डवरून निमाणीकडे जात असताना बसचा धक्का एका इनोव्हा कारला लागला. इनोव्हा कारचालकाने वाहन रस्त्यातच थांबविले व त्यानंतर बस व इनोव्हा चालकांत वाद झाला. सदरचे वाहन हे परिसरातीलच एका ट्रव्हल्स कंपनीचे असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यातील काहींनी बसमध्ये चढून बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
बस रस्त्यातच थांबल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारी किशोर देसले यांनी दोन्ही वाहने पंचवटी पोलीस ठाण्यात आणली. त्याचवेळी पोलीस उपआयुक्त एन. अंबिका या पोलीस ठाण्यात असल्याने दोघाही चालकांनी अपघाताचे कारण स्पष्ट केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी चालकांशी चर्चा करून अपघाताची तक्रार नोंदवा असे सांगताच दोघाही चालकांनी तक्रार देण्यास टाळाटाळ करत पोलीस ठाण्याबाहेर काढता पाय घेतल्याने वाद मिटला. त्यामुळे पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात बसचालकास एका कर्मचाऱ्याला टोळक्याकडून आगारात घुसून मारहाण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि निवेदन दिले होते. ती घटना ताजी असतानाच पुन्हा मोटारीला धक्का लागल्याचे निमित्त करून चालाकाला मारहाण करण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Bicycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.