बसचालकाला मारहाण
By Admin | Updated: August 28, 2014 01:13 IST2014-08-27T12:16:16+5:302014-08-28T01:13:41+5:30
तालुक्यातील वडनेर खाकुर्डी शिवारात रामपुरा रस्त्यावर बसचालकास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणार्या दुचाकीस्वाराविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.

बसचालकाला मारहाण
मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी शिवारात रामपुरा रस्त्यावर बसचालकास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणार्या दुचाकीस्वाराविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने बसचालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बसचालक दीपक त्र्यंबक सोनवणे (वय ४५, रा. खाकुर्डी) याने फिर्याद दिली. म्हसदी - मालेगाव ही बस सोनवणे हे मालेगावकडे चालवून नेत असताना रामपुरा रस्त्यावर एमएच १५ एसी ८२८९ क्रमांकाची दुचाकी रस्त्यावर उभी होती. सोनवणे यांनी दुचाकीस्वारास दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने बसचालकास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार तिवारी करीत आहेत. (वार्ताहर)