नाशिक : पंचवटीतील हिरावाडी येथील संजय संघवी व नाशिकरोड येथील रहिवासी दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी असा सायकलवर प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा तसेच बेटी बचावचा संदेश दिला. विशेष म्हणजे दररोज व्यायाम म्हणून सायकल चालविणारे हे सायकलिस्ट वयाची साठी पार केलेले आहेत.संजय संघवी व दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी प्रवास करताना ठिकठिकाणी थांबून बेटी बचाव व पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. महाराष्ट्र, गोवा या मार्गाने त्यांनी कोस्टल रोडने प्रवास केला. नाशिक सायकलिस्टचे प्रवीण खाबिया, डॉ. मनीषा रौंदळ तसेच मोहन देसाई यांचे त्यांना सहकार्य लाभले. आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनदेखील प्रवास केला.ठिकठिकाणी स्वागतया सायकलवारीत गोवा राज्यापर्यंत मिलिंद देशपांडे, चांगदेव घुमरे, बापू पगार हे सहकारी सोबत होते. सायकल मोहीम राबवून परतल्यानंतर नाशिक येथे स्थानिक तसेच मुंबई येथील दत्तछंद परिवारातर्फे जुना आडगाव नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दत्तछंद परिवाराचे अध्यक्ष राजू शिंगणे, मिलिंद राजगुरू, प्रसाद शिंगणे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठांचा कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:09 IST
पंचवटीतील हिरावाडी येथील संजय संघवी व नाशिकरोड येथील रहिवासी दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी असा सायकलवर प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा तसेच बेटी बचावचा संदेश दिला.
ज्येष्ठांचा कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास
ठळक मुद्देपर्यावरणाचा संदेश : वयाच्या साठीत भ्रमंती