खर्डे येथे सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:16 IST2020-01-19T22:14:02+5:302020-01-20T00:16:44+5:30

खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Bicycle Rally at Khard | खर्डे येथे सायकल रॅली

खर्डे विद्यालयातर्फे आयोजित सायकल रॅलीचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करताना मुख्याध्यापक अंबादास देवरे, यशवंत माणखेडकर, सुनील पंजे, दिलीप आहेर आदी.

खर्डे : येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक अंबादास देवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला शुभारंभ करण्यात आला. रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, गावातील युवक सहभागी झाले होते. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकचे जगदीश शिंदे, यशवंत देवरे यांनी फीट इंडियासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व उपस्थिताना पटवून दिले.

Web Title: Bicycle Rally at Khard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.