दुचाकी अपघात; सोनांबेतील युवक ठार
By Admin | Updated: October 18, 2016 23:01 IST2016-10-18T23:01:18+5:302016-10-18T23:01:18+5:30
दुचाकी अपघात; सोनांबेतील युवक ठार

दुचाकी अपघात; सोनांबेतील युवक ठार
सिन्नर : शिवडे-सोनांबे रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन तालुक्यातील सोनांबे येथील उत्तम सोपान घोडे (३४) हा युवक ठार झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. स्प्लेंडर मोटारसायकलने उत्तम सोपान घोडे व अन्य एकजण जात असताना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. त्यात घोडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, हवालदार नितीन मंडलिक अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)