दुचाकीला अपघात; दोघे जखमी, एक गंभीर
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T01:36:13+5:302014-07-23T00:34:42+5:30
दुचाकीला अपघात; दोघे जखमी, एक गंभीर

दुचाकीला अपघात; दोघे जखमी, एक गंभीर
वणी : भाजीपाला विक्री करून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात जीपने धडक दिल्याने दोघे जखमी झाले असून, महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जगन्नाथ पंढरीनाथ लहितकर व मुक्ताबाई जगन्नाथ लहितकर यांच्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय भाजीमंडईमध्ये असून, नेहमीप्रमाणे कामकाज आटोपून हे दोघे पती-पत्नी दुचाकीवर वणी-दिंडोरी रस्त्यावरून आपल्या घरी जात असताना बसस्थानकासमोर रात्रीच्या सुमारास क्रुझर जीपने मागून धडक दिल्याने जगन्नाथ किरकोळ जखमी, तर मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या
असून, पोलिसांत याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सदर जीपचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)