शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट हल्ले : राज्याच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी पिंजला दारणाकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:08 IST

रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली.

ठळक मुद्देबिबट हल्ल्यात झालेली मनुष्यहानी दुर्दैवीबिबट रेस्क्यूबाबत पथकाला मार्गदर्शन

नाशिक : तालुक्याचा पुर्व भाग असलेला दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाला आहे. या भागातील बिबट्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाचे बोरिवलीचे पथक पुन्हा माघारी बोलविण्यात आले आहे. तसेच सोमवारी (दि.२९) राज्याचे पश्चिम वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दारणाकाठाला भेट देत बोरिवली,  नाशिकच्या वन्यजीव बचाव पथकाला विविध उपाययोजनांबाबत सुचना दिल्या.रविवारी (दि.२८) सामनगावमध्ये एका चार वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालून जखमी केल्याची घटना घडली. दारणाकाठालगतच्या आठ ते दहा गावांमध्ये मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या भागात एप्रिलपासून अद्याप तीन मुले, एक वृध्द असे चार बळी गेले आहेत तर दोघा चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. ऊसशेतीचा विस्तर्ण परिसर असल्यामुळे या भागात बिबट्यांचा सुळसुळाट होऊ लागला आहे. या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी सातत्याने नाशिक पश्चिम वनविभाग प्रयत्न करत असून अद्याप यश आलेले नाही. आठवडाभरापुर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर हे पथक तीन दिवस दारणाभागात तळ ठोकून राहिले; मात्र तेव्हा बिबट्याने कोठेही दर्शन दिले नाही किंवा पिंज-यातसुध्दा आला नाही. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दस्तुरखुद्द वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. त्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर यांनीही स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या भागातील बिबट्याला थेट बेशुध्द करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.लिमये यांनी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्यासह दुुपारी चार वाजता सामनगावातून दारणाकाठाचा परिसर पिंजण्यास सुरूवात केली. येथील शेतक-यांशीसुध्दा त्यांनी यावेळी संवाद साधला. रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. तसेच वनविभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबतही सांगितले.ऊसशेतीचे बिबट ‘रेस्क्यू’पुढील मोठे आव्हानदारणानदीकाठालगतचे सामनगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चाडेगाव या भागात लिमये यांनी पथकासह पाहणी दौरा केला. येथे असलेली ऊसशेती हे बिबट जेरबंद करण्यापुढील मोठे आव्हान ठरत आहे. तसेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येलासुध्दा हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले.बारा दिवसांत दुसरा हल्लाबारा दिवसांपुर्वी ११ जून रोजी संध्याकाळी गुंजन नेहरे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. ही घटना सामनगावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वर गावात घडली होती. या घटनेला बारा दिवस पुर्ण होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने चार वर्षाच्या ओमवर हल्ला चढविला. यामुळे पसिरात बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकleopardबिबट्याwildlifeवन्यजीव