भऊर, विठेवाडी रस्ता गेला वाहून
By Admin | Updated: July 22, 2016 22:51 IST2016-07-22T22:32:53+5:302016-07-22T22:51:45+5:30
लोहोणेर : पहिल्याच पावसात झाली ग्रामस्थांची गैरसोय

भऊर, विठेवाडी रस्ता गेला वाहून
लोहोणेर : भऊर - विठेवाडीदरम्यान असलेला शिवरस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत असून, सदर रस्त्याची त्वरित दुरु स्ती करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
मुसळधार पावसामुळे सदरचा फरशीपूल व मातीचा भर वाहून गेल्याने शिवरस्ता पूर्णत: बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी अनंत अडचणी निर्माण झाल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित फरशीपुलाची दुरु स्ती करून शिवरस्ता सुरळीत करावा तसेच सदर शिवरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून देण्यात यावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता लोहोणेर - कळवण रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर कुबेर जाधव, नानाजी पवार, दिनकर जाधव, अभिजित पवार, अमर जाधव, फुला जाधव आदिंसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)