वड्याचे पाडे येथे नवीन शाळा इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:00+5:302021-09-13T04:14:00+5:30
गेल्या तीन-चार वर्षांपासून शाळेचे वर्ग पडले होते. त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी व बसण्यासाठी जागा नव्हती. येथील ...

वड्याचे पाडे येथे नवीन शाळा इमारतीचे भूमिपूजन
गेल्या तीन-चार वर्षांपासून शाळेचे वर्ग पडले होते. त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी व बसण्यासाठी जागा नव्हती. येथील शिक्षक नितीन सावकार,रवींद्र चौरे यांनी प्रथम मारुती मंदिरात व त्यानंतर नामदेव ठाकरे यांच्या खासगी घरामध्ये ज्ञानदानाचे कामकाज सुरू ठेवले. येथील ग्रामपंचायत सदस्य बाबुराव बागुल, नारायण सूर्यवंशी व शाळा समितीचे अध्यक्ष अरुण ठाकरे यांनी वारंवार जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे व प्रशासनाकडे शाळेच्या इमारतबाबत विनंती केली. गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे व विस्तार आधिकारी विजय पगार, केंद्रप्रमुख हिरालाल बधान ,केंद्र मुख्याध्यापक गुलाब ठाकरे, मुख्याध्यापक नितीन सावकार, उपशिक्षक रवींद्र चौरे यांनी पाठपुरावा करून जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांनी आपल्या निधीतून १९ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शिक्षक दिनानिमित्त औचित्य साधून शाळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक तुकाराम देशमुख,पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी,किरण ठाकरे,भावदास महाले, केंद्रप्रमुख हिरालाल बधान, गौरव ठाकरे, भाऊसाहेब बागुल उपस्थित होते.