उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे भुमीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:51 IST2020-12-02T18:42:52+5:302020-12-02T18:51:11+5:30

सटाणा : नगरपरिषदेच्या वतीने नामपूर रोड येथील कॉ. उदाराम देवरे स्मृती उद्यानात वाचनालय व उद्यान सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ मविप्र संचालक डॉ प्रशांत देवरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

Bhumipujan of garden beautification work | उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे भुमीपूजन

उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे भुमीपूजन

ठळक मुद्देनगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली

सटाणा : नगरपरिषदेच्या वतीने नामपूर रोड येथील कॉ. उदाराम देवरे स्मृती उद्यानात वाचनालय व उद्यान सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ मविप्र संचालक डॉ प्रशांत देवरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

या जागेत स्व.आनंदा निकम यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वाघ, उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी, गटनेते महेश देवरे, नितिन सोनवणे, सभापती, राहुल पाटिल, नगरसेवक सोनाली दत्तु बैताडे, रुपाली सोनवणे, डॉ विद्या सोनवणे, मनोहर देवरे, दत्तु बैताडे, वैभव गांगुर्डे, संदीप पगार, दिलीप निकम, निखिल अहिरे,आदी उपस्थीत होते.
 
Web Title: Bhumipujan of garden beautification work

टॅग्स :Governmentसरकार