त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजना विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:30 PM2019-02-09T16:30:28+5:302019-02-09T16:30:49+5:30

रावल यांची उपस्थिती : सुमारे ३८ कोटी रुपयांची योजना

 Bhumibhujan of development work of Prasad Yojana for Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजना विकास कामांचे भूमिपूजन

त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजना विकास कामांचे भूमिपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देरोजगाराची निर्मीती करण्यासाठी राज्यातील ४५० किल्ल्यांचे संवर्धन, सौदर्यीकरण हाती घेण्यात येत आहे

त्र्यंबकेश्वर : येथे ३७.८१ कोटी रु पयांच्या प्रसाद योजनेतील १७ विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे पर्यटन तथा रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येत्या वर्षभरात त्र्यंबकेश्वरचा कायापालट केला जाणार असल्याचे आश्वासन रावल यांनी बोलताना दिले.
अहल्या गोदावरी संगमघाटावर असलेल्या नरायण नागबली धर्मशाळेच्या भूमिपूजनाने योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, पर्यटन सचिव विनिता सिंगल,भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार योगेश घोलप, भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अभियंता विनय वावधने, दत्ता गायकवाड आदिंसह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत बोलताना रावल यांनी सांगितले, राम मंदिरासाठी आम्ही कटीबध्द आहोत, त्याच सोबत प्रभुरामचंद्राचा पदस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी रामायण सर्कीटच्या माध्यमातून कोटयवधी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. रोजगाराची निर्मीती करण्यासाठी राज्यातील ४५० किल्ल्यांचे संवर्धन, सौदर्यीकरण हाती घेण्यात येत आहे. रायगडावरु न येत्या ११ तारखेस याची घोषणा करण्यात येणार असून किल्ल्यांच्या सौंदर्यीकरणातून स्थानिकांना रोजगार हमी अंतर्गत कामे उपलब्ध होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ निवृत्ती जाधव, दिनकर आढाव, मनोहर मेढे पाटील, समाधान बोडके शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके, भाजपाचे विनायक माळेकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्नील शेलार, सागर उजे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शामराव गंगापुत्र, बांधकाम सभापती सायली शिखरे, आरोग्य सभापती माधवी भुजंग,शिवसेना गटनेत्या मंगल आराधी, नगरसेविका कल्पना लहांगे, त्रिवेणी तुंगार, आदी उपस्थित होते.

Web Title:  Bhumibhujan of development work of Prasad Yojana for Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक