विविध विकासकामांचे भूमिपूजन
By Admin | Updated: October 23, 2016 23:29 IST2016-10-23T23:29:17+5:302016-10-23T23:29:43+5:30
आशेवाडी : मारुती मंदिर सभागृहास २५ लाख

विविध विकासकामांचे भूमिपूजन
दिंडोरी : तालुक्यातील आशेवाडी येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
जि. प. सदस्य मनीषा बोडके, माजी पंचायत समिती सदस्य श्याम बोडके यांनी स्वागत केले. याप्रसंगी भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष समीर चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कावळे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बडे, अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष मदन लोखंडे, सरपंच श्रीमती वायकांडे, उपसरपंच शंकर बोडके, कचेश्वर बोडके, संजय बोडके, संजय मुरलीधर बोडके, धनंजय उगले, संदीप कापसे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)