श्रीरामकथा यज्ञेच्या सभामंडपाचे भूमिपूजन
By Admin | Updated: August 8, 2015 23:20 IST2015-08-08T23:17:12+5:302015-08-08T23:20:40+5:30
कनकेश्वरी देवींचा कथासप्ताह

श्रीरामकथा यज्ञेच्या सभामंडपाचे भूमिपूजन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील संत कनकेश्वरी देवी यांचे ४ ते १२ सप्टेंबरदरम्यान त्र्यंबकेश्वर येथे श्रीरामकथा यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे त्र्यंबकेश्वरला नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
नाशिक येथील श्री सदगुरू परिवाराच्या माध्यमातून या श्रीरामकथा यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संत कनकेश्वरी देवी यांचा गुजरातसह देशभरात मोठा भक्त परिवार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील जागेत या श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी १२० बाय २५० मीटरचा सभामंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपाचे भूमिपूजन त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
सभामंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी अहमदाबादचे हितेश चावडा, अनिल जानी, संजय शहा तसेच
नाशिक येथील भरत ठक्कर, अनिल बिरारी, प्रफुल्ल ढोलकिया,
भरत भिंडे, संजय ठक्कर आदि उपस्थित होते. या श्रीरामकथा यज्ञासाठी श्री पंचायती आखाडा, बडा उदासीनचे महंत रघुमुनिजी महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)