शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांची भाजपच्या वसंत गितेंनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:18 IST

राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक परपक्षांतील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचीदेखील चर्चा सुरू असतानाच सोमवारी (दि.९) राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली आणि आशीर्वादही घेतले.

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक परपक्षांतील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचीदेखील चर्चा सुरू असतानाच सोमवारी (दि.९) राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली आणि आशीर्वादही घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे गिते यांनी ज्येष्ठत्वाच्या जोरावर भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चादेखील सुरू झाल्या आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ सोमवारी (दि.९) प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्टÑवादी आणि कॉँग्रेसबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यातच भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी ही हजेरी लावल्याने राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरला. वसंत गिते हे शिवसेनेत कार्यकर्ता असल्यापासून त्यांचेआणि छगन भुजबळ यांचे चांगले संबंध आहेत. गिते यांनी शिवसेनेनंतर मनसेत प्रवेश करून राज ठाकरे यांना साथ दिली. प्रदेश सरचिटणीसपदावर काम करताना ते मनसेचे आमदारही झाले. त्यानंतर महापालिकेत मनसेची सत्ताही आली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी बिनसल्यानंतर गिते भाजपवासी झाले.भाजपने २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते यांना उमेदवारी तर दिलीच शिवाय अनेक ज्येष्ठांना डावलून त्यांना उपमहापौरपददेखील दिले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी नाकारण्यात आली आणि या मतदारसंघात विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाच पक्षाने संधी दिली. तेव्हापासून गिते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भुजबळ यांच्या भेटीमागे या नाराजीचे वलय असल्याचीदेखील चर्चा आहे. अर्थात, गिते यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती. तसेच त्यांचे आशीर्वाददेखील घेतले. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहित नाते असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विधानसभा निवडणुकीपासून वसंत गिते काहीसे नाराज आहेत. भुजबळ यांच्या भेटीमागे या नाराजीचे वलय असल्याचीदेखील चर्चा आहे. अर्थात, गिते यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती. तसेच त्यांचे आशीर्वाददेखील घेतले. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहित नाते असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाVasant Giteवसंत गीतेNCPराष्ट्रवादी काँग्रेस