भोजापूरचा गाळ उपसा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:23 AM2019-02-13T00:23:19+5:302019-02-13T00:23:33+5:30

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.

Bhojapur's sludge paused | भोजापूरचा गाळ उपसा रखडला

भोजापूरचा गाळ उपसा रखडला

Next
ठळक मुद्देसिन्नर : पाणी साठवण क्षमता वाढविण्याची कळकळ केवळ बोलण्यापुरतीच


 

 

सचिन सांगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.
सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून उगम पावणाºया म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण असून, सुमारे ३६५ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे. भोजापूर धरणावर परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. हे धरण परिसरासाठी वरदान ठरलेले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता तसेच टेकड्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली होती. धरणातील गाळ काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत ‘लोकमत’ने अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध केले होते.
गेल्या वर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव करून मेरी संस्थेमार्फत धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्या अहवालात धरणात १३ लाख ६७ हजार ४२८ घनमीटर गाळ साचला आहे, म्हणजे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कमी झाला असे नमूद करण्यात आले होते. आमदार वाजे यांनी पुढाकार घेऊन धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तयारी केली होती. पाटबंधारे विभागाने सुमारे ४० लाख ८६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या तालुकास्तर बैठकीत आमदार वाजे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली. सदरचे काम युवा मित्र, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाणार होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेश
निघाला होता. पहिल्या टप्प्यात धरणातून ३ लाख ६५ हजार ४७४ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार होता. भोजापूर धरणातील टेकड्या हटविल्यानंतर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गतवर्षी तालुक्यातील कोनांबे व ठाणगाव धरणातील गाळ लोकसहभागातून काढला आहे. या भागातील शेतकरी व नागरिकांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. धरणातील गाळ व टेकड्या काढल्यानंतर ३० ते ४० दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता वाढू शकते.
- एस. एस. गोंदकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभागलोकसहभाग नसल्याने अडली कामेगेल्या वर्षी धरणातील गाळ काढण्यासाठी युवा मित्र संस्थेने दोन पोकलेन व डंपर ही यंत्रसामग्री धरण क्षेत्रावर आणून ठेवली होती. गाळ उपसल्यानंतर शेतकºयांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून न्यायचा होता; मात्र गाळ वाहून नेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आठ दिवसानंतर यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर गाळ उपशाचे काम अद्याप सुरू झाले नाही. लोकसहभाग नसल्याने धरणातील गाळ उपसा रखडला आहे. भोजापूर धरण तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्याने धरण गाळमुक्त करण्याचा आपला मानस आहे. पाण्याची पातळी वाढवून लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्याचा फायदा होईल. भोजापूर धरणातील गाळ व टेकड्या काढण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. पहिल्या टप्प्यातील कामास गेल्या वर्षी सुरुवात होणार होती. आठ दिवस धरण क्षेत्रात यंत्रसामग्री उभी होती; परंतु शेतकरी व लोकसहभाग नसल्याने काम होऊ शकले नाही. गाळ वाहून नेण्यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर

Web Title: Bhojapur's sludge paused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.