भोजापूर खोरे विद्यालय, चास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST2021-08-02T04:06:53+5:302021-08-02T04:06:53+5:30

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित तालुक्यातील चास येथील भोजापूर खोरे विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा ...

Bhojapur Valley School, Chas | भोजापूर खोरे विद्यालय, चास

भोजापूर खोरे विद्यालय, चास

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित तालुक्यातील चास येथील भोजापूर खोरे विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बंडूनाना भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विश्वस्त मारुती दराडे, संचालक जगन्नाथ खैरनार, चंद्रभान दराडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. शिरसाट, अत्तार, संचालक सी. आर. दराडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

टिळक व साठे यांच्या कार्याची माहिती मान्यवरांनी दिली. सी. आर. दराडे यांनी प्रास्ताविक केले, तर पी. के. शेळके व बिडगर यांनी सूत्रसंचालन केले. एन. एम. सांगळे, बी. के. आव्हाड, बी. आर. सानप आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी : ०१ चास १

चास येथील भोजापूर खोरे विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी बंडूनाना भाबड, मारुती दराडे, जगन्नाथ खैरनार, चंद्रभान दराडे, एस. डी. शिरसाट, अत्तार, सी. आर. दराडे.

010821\01nsk_6_01082021_13.jpg

चास येथील भोजापूर खोरे विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी बंडूनाना भाबड, मारूती दराडे,  जगन्नाथ खैरनार, चंद्रभान दराडे, एस. डी. शिरसाट, अत्तार , सी. आर. दराडे 

Web Title: Bhojapur Valley School, Chas