फुलेनगर येथे भीमज्योती रॅली
By Admin | Updated: December 5, 2015 23:13 IST2015-12-05T23:12:45+5:302015-12-05T23:13:48+5:30
फुलेनगर येथे भीमज्योती रॅली

फुलेनगर येथे भीमज्योती रॅली
नाशिकरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे मालधक्का फुलेनगर येथील सार्वजनिक सांस्कृतिक कला, क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने परिसरातून भीमज्योत रॅली काढण्यात आली होती.
मालधक्का परिसरातून रॅली काढण्यात आली होती. रेल्वेस्थानक येथील आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी पुतळा, बिटको चौक, दत्तमंदिर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये संघटनेचे अध्यक्ष किशोर कटारे, दीपक बनसोडे, रवि पगारे, अतुल उबाळे, अमोल चंद्रमोरे, राजू शेख, नितीन महाले, मनोज पवार, अर्जुन पवार, विजय बटाव आदिंसह आंबेडकरप्रेमी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)