भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 12:21 AM2021-06-02T00:21:21+5:302021-06-02T00:21:49+5:30

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Bhegu project will solve water problem of 20 villages | भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

googlenewsNext
ठळक मुद्देतळमोरीच्या दुरुस्तीत यांत्रिकी विभागाला यश

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे पाईप विमोचक दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते, याकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी पाटील यांनी युद्ध पातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या साहाय्याने मंगळवारी युद्धपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.
पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल, मे, जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो. दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.

राज्यातील पहिला प्रयोग २००० मध्ये यशस्वी
गुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून अडविले. तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवांना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग स्व. पवार यांनी सन २००० मध्ये यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते. जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधून पाणी येणे बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून पाणबुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नव्हते. त्यामुळे या पाण्यापासून विरशेत ,मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचित झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.
फोटो - ०१ कळवण १

Web Title: Bhegu project will solve water problem of 20 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.