भातोडेच्या सरपंचपदी गावित; उपसरपंचपदी बेबीबाई महाले
By Admin | Updated: July 15, 2016 23:36 IST2016-07-15T23:33:58+5:302016-07-15T23:36:47+5:30
भातोडेच्या सरपंचपदी गावित; उपसरपंचपदी बेबीबाई महाले

भातोडेच्या सरपंचपदी गावित; उपसरपंचपदी बेबीबाई महाले
वणी : दिंडोरी तालुक्यातील भातोडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय गावित, तर उपसरपंचपदी बेबीबाई महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नऊ सदस्यांची बैठक झाली. सरपंचपदासाठी दत्तात्रय गावित व उपसरपंचपदासाठी बेबीबाई महाले यांचे अर्ज दाखल झाले होते. भातोडे व धरमबरडा ग्रुप ग्रामपंचायत आहे.
निवडीनंतर गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी किरण महाले, दशरथ महाले, रंगनाथ चव्हाण, पंडित पालवी, सुनील जोपळे, विश्वनाथ खांडवी, तुळशीराम महाले, जयराम कुवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते. (वार्ताहर)