भरत कावळे यांना शोकसभेत श्रद्धांजली
By Admin | Updated: April 24, 2017 01:37 IST2017-04-24T01:37:06+5:302017-04-24T01:37:16+5:30
ओझर : पाणीवापर वापर संस्थेचे जनक कार्याध्यक्ष भरत कावळे यांचे १८ एप्रिलला निधन झाले. त्यानिमित्त आयोजित शोकसभेत आलेल्यानी आठवणींना उजाळा दिला.

भरत कावळे यांना शोकसभेत श्रद्धांजली
ओझर : पाणीवापर वापर संस्थेचे जनक समाजपरिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत कावळे यांचे १८ एप्रिलला निधन झाले. त्यानिमित्त येथील माळी मंगल कार्यालयात आयोजित शोकसभेत राज्यभरातून आलेल्या विविध मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला, तर या पाणीदार नेतृत्वाच्या अनेक किस्स्यांना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
कुमार औरंगाबादकर यांनी संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला. जिल्हाभरातून आलेल्या विविध पाणीवापर संस्थांच्या व कामगार क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त आपल्या मनोगतातून पाण्याबरोबर कामगार क्षेत्रातही कावळे यांच्यासारखे भरीव योगदान आतापर्यंत कुणी दिले नसून, कंत्राटीपद्धत सुरू करण्याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते, असे अधोरेखित केले. प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी वाघाड प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत कसा वरदान ठरला याबाबत सांगितले. सुभाष लोमटे यांनी पाण्यासाठी निष्ठेने आग्रह धरणारा व शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचेल यात त्यांचा हातखंडा होता.
यावेळी गोपाळ पाटील सोमनाथ मुळाने, अशोक कदम, शंकर वाघ, आर.जे पाटील, मुख्य अभियंता पोकळे मोतीराम झालट, शाह सोमवंशी, अर्जुन कोकाटे, अलका एकबोटे, काचेश्वर बारसे, शांताराम पठाडे, प्रदीप खरे आदींनी श्रद्धांजलीअर्पण केली.
शोकसभेत व्यापीठावर पडद्यावर कावळे यांचा जीवनपट दाखवण्यात आला. शोकसभेस गावातील
सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)