भाम धरण : विस्थापितांच्या लढ्याला यश
By Admin | Updated: January 29, 2016 22:40 IST2016-01-29T22:34:29+5:302016-01-29T22:40:57+5:30
पुनर्वसन सपाट जागेवरच होणार

भाम धरण : विस्थापितांच्या लढ्याला यश
घोटी : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आलेल्या भरवज व निरपण या दोन प्रमुख गावांसह इतर तीन वाड्यांचे पुनर्वसन डोंगरावर न करता धरणाच्या पायथ्याशी सपाट जागेवर करण्यात यावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम होऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमिका विस्थापितांनी घेतल्याने अखेर याबाबत आमदार निर्मला गावित यांनी विस्थापतांची बाजू मांडीत सपाट जागेवरच पुनर्वसन करा, असे आदेश शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, याबाबत भाम धरणाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या आदेशाला हिरवा कंदील दिला असून, पुनर्वसन सपाट भूभागावर करण्याचे मान्य
केले. पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी सपाटी भूभागावर व्हावे, अशी
मागणी विस्थापितांनी गावित यांच्याकडे करून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.
या मागणीची आमदार गावित यांनी दखल घेत शुक्र वारी (दि.२९) विस्थापित, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दरेवाडी, सारु क्तेवाडी आणि बोरवाडीच्या विस्थापितांनी डोंगरावरील पुनर्वसनास कडवा विरोध करीत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने गावित यांनी या तिन्ही वाड्यांचे पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी करा, असे आदेश दिला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, राघवेंद्र भाट आदिंसह शेकडो विस्थापित उपस्थित होते. भाम धरणाच्या विस्थापितांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध केले
होते. (वार्ताहर)