शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:05 IST

सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा

ठळक मुद्दे४३० कुटूंबाचे स्थलांतर : महिनाअखेर ताबा जलसंपदेकडे बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणा-या इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळ भरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रूपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमीनीवर असलेले पीके, घर, गोठयांचेही मुल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादीत करण्यात आली. परंतु पुनवर्सनाच्या प्रश्नी काम धिम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पुर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनवर्सनासाठी धरणाच्या बाजुलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादीत करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुर्नवसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणा-या खर्चातही दरवर्षी वाढ होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भाम धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रूपये विशेष प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे एकूण ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले असून, ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरीत होतील असा अंदाज आहे.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक