शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिन्नर येथे उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:11 IST

येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सिन्नर : येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवारी सकाळपासून रथ व कावडी सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन मिरवणुकीस ढोल-ताशा व टाळ-मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार असून गंगावेस, लालचौक, महालक्ष्मी रोड, खडकपुरामार्गे शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरून रथोत्सव व गंगाजलांच्या कावडींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथ मिरवणुकीपुढे त्र्यंबकबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी सहाला सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. शहरातील पाचोरे कुटुंबीयांकडे रथ हाकण्याचा मान असतो. रथाच्या दोन्ही बाजूने भालदार चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालतात. रथाला बैलजोड्या जुंपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ असते. त्यासाठी बैलांना पोळ्याच्या सणाप्रमाणे स्वच्छ धुवून व सजवून मिरवणुकीच्या मार्गावर सज्ज ठेवतात. रथामागे सहभागी झालेल्या कावडीधारकांच्या स्वागतासाठी पाट मांडण्यात येऊन त्यावर त्यांचे पाय धुवून पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच कावडीधारकांना गूळ-खोबरे, पेढे, साखरफुटाणे देण्यात येतात. रथयात्रा संपूर्ण गावापासून सूर्यास्तापर्यंत भैरवनाथाच्या पटांगणात येते. याठिकाणी कावडीधारकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. कावडीतील गोदावरीच्या पाण्याने भैरवनाथ मूर्तीस अभिषेक घातला जातो. मंदिराभोवती दिव्यांची रोषणाई करण्यात येते. मुला-मुलींसाठी खेळणी व मिठाईची दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे.  शुक्रवारी रात्री ९ वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्री पुणे येथील दत्ता महाडिक यांचा लोकना ट्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांच्या मनोरंजनासाठी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येते. भरलेल्या यात्रेत भाविक व ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. यात्रोत्सवात परिसरातील अनेक गावांतील भाविक, कावडीधारक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेत मेवा-मिठाई, खेळणीच्या दुकानांतून मोठी आर्थिक उलाढाल होते. शनिवारी (दि. ३१) म्हणजे यात्रेच्या दिवशी कुस्त्यांची दंगल होणार आहे. बारादारी येथे सायंकाळी ५ वाजता राज्यभरातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.भाविकांची लगबग, मंदिराजवळ सांगता  येथील भैरवनाथ महाराज यात्रेतील रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते तर आपल्या बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असते. सजवलेल्या बैलांना रथास जुंपल्यावर थोडासा रथ पुढे सरकला की, दुसरा शेतकरी बैल घेऊन हजर राहतो. हीच लगबग दिवसभर सुरू असते. रात्री मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात येते.

टॅग्स :Nashikनाशिक