Bhairavnath Jogeshwari: The crowd of thousands of devotees in the Rath yatra | भैरवनाथ जोगेश्वरी रथयात्रेत हजारो भाविकांचे लोटांगण
भैरवनाथ जोगेश्वरी रथयात्रेत हजारो भाविकांचे लोटांगण

वडनेर भैरव : येथील कालभैरवनाथ जोगेश्वरीमाता यात्रा रथ मिरवणुकीला गुरूवारी जल्लोषात प्रारंभ झाला. याप्रसंगी रथामागे महिलांनी दंडवत व पुरूषांनी लोटांगण घालून नवसपुर्ती केली. या यात्रेत ठिकठिकाणी रथाला बैलजोडी जुंपली जात होती. भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. भाविकांनी त्या मनमोहक क्षणाचा मनस्वी आनंद लुटला. यात्रेत रथ मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी व रथावर फुलाचा वर्षाव करण्यात येत होता. यात्रेत भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. महिला दंडवत तर पुरु ष लोटांगण घालत होते. या यात्रेत राज्यभरातून भाविक आलेले आहेत. राष्टीय एकत्मतेचे प्रतिक म्हणून ओळखली जाणारी ही आगळी वेगळी व वैशिष्ठ्यपूर्ण मानली जाते.


Web Title: Bhairavnath Jogeshwari: The crowd of thousands of devotees in the Rath yatra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.