कळवणला उपनगराध्यक्षपदी भाग्यश्री पगार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:17 IST2018-03-27T00:17:30+5:302018-03-27T00:17:30+5:30
नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना विकास आघाडीच्या व भाजपाच्या प्रभाग क्र. तीनच्या नगरसेवक भाग्यश्री गौरव पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांनी पगार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच समर्थकांनी गांधी चौक, नगरपंचायत कार्यालय व गणेशनगर भागामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

कळवणला उपनगराध्यक्षपदी भाग्यश्री पगार बिनविरोध
कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना विकास आघाडीच्या व भाजपाच्या प्रभाग क्र. तीनच्या नगरसेवक भाग्यश्री गौरव पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांनी पगार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच समर्थकांनी गांधी चौक, नगरपंचायत कार्या लय व गणेशनगर भागामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांनी आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्याउपनगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये सोमवारी सकाळी निर्धारित वेळेत नगरपंचायतच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. १७ नगरसेवक असलेल्या नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा व शिवसेना यांच्या विकास आघाडीची सत्ता आहे. उपनगराध्यक्षपदासाठी निर्धारित वेळेत पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तहसीलदार चावडे यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष सुनीता पगार, गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर पगार, अनिता जैन, जयेश पगार, अतुल पगार, दिलीप मोरे, मयूर बहिरम, बाळासाहेब जाधव, नगरसेवक अनुराधा पगार, रंजना पगार, रंजना जगताप, रोहिणी महाले, सुरेखा जगताप, अनिता महाजन आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. पोपट पगार, नंदकुमार खैरनार, सुभाष पगार, कैलास खैरनार, जितेंद्र पगार, हरिश्चंद्र पगार, मोतीराम पगार, सुनील महाले, गौरव पगार, गोपी पगार, डॉ. सम्राट निकम, अशोक पगार, हेमंत रावले, सुरेश पगार, बंडू पगार, संदेश पगार, धनंजय पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाला संधी, सहाव्यांदा निवड
कळवण नगरपंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर कळवणच्या प्रथम उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीपुरस्कृत अनिता महाजन, तर दुसऱ्यांदा रंजना पगार यांना संधी मिळाली होती. तृतीय उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता जैन, चौथ्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब जाधव व पाचव्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे साहेबराव पगार यांना संधी मिळाली होती. उपनगराध्यक्षपदाच्या सहाव्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या भाग्यश्री पगार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा व अपक्षांनाही उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेनेचे सर्व सदस्य आम्ही एकसंघ असून, शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून मिळालेल्या संधीचे सोने करून जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वपक्षाच्या नगरसेवकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून शहर विकासासाठी प्रयत्न करेल. जनतेची सेवा करण्याचे आपले धोरण असून, त्याची अंमलबजावणी येत्या काळात करू.
- भाग्यश्री पगार, उपनगराध्यक्ष, कळवण