शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

आश्वासनानंतर भागवत यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:42 IST

गवंडगावसह चार गावांच्या रस्त्यांसह देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता ते तळवाडे रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गवंडगाव येथे उपसभापती रूपचंद भागवत यांचे सुरू असलेले उपोषण शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या मध्यस्थीने व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

येवला : गवंडगावसह चार गावांच्या रस्त्यांसह देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता ते तळवाडे रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गवंडगाव येथे उपसभापती रूपचंद भागवत यांचे सुरू असलेले उपोषण शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या मध्यस्थीने व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.  गवंडगाव हे येवला तालुक्यातील येवला-वैजापूर हायवेलगतचे गाव आहे. गवंडगाव येथून देवठाण, देवळाणे, गारखेडे असे रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सदर रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्ता दगड गोट्यांनी व्यापून गेलेला आहे. चारही रस्त्यांच्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे. देवठाण रस्ता हा नदीतून जाणारा आहे. नदीवर पूल नाही. चारही रस्ते वापरण्यास योग्य नाही त्यामुळे पूर्ण वर्षभर रस्त्याने मालवाहतूक करताना व विद्यार्थ्यांना शाळेत जाता-येताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हे रस्ते मंजूर करून डांबरीकरण करण्याबाबत जिल्हा नियोजन मंडळ अध्यक्षांकडे मागणी करण्यात आली आहे.आमदार छगन भुजबळ यांनी आमदार निधीतून रस्त्याचे काम करावे याकरिता पत्र दिले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयासही पत्र दिले. आजपर्यंत कोणत्याच पत्राची कोणीही दखल घेतली नाही म्हणून गवंडगाव येथे देवठाण रस्त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले होते.  दरम्यान, तहसीलदार नरेश बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, सभापती नम्रता जगताप, भागवतराव सोनवणे, रतन बोरनारे, प्रवीण गायकवाड, पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार असल्याने दोन दिवस उपोषण सुरूच होते. त्यानंतर संभाजी पवार यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासंदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक