भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा व्याख्याने : यशवंत सिन्हा यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:50 IST2018-03-23T00:50:25+5:302018-03-23T00:50:25+5:30
नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा व्याख्याने : यशवंत सिन्हा यांची उपस्थिती
नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. बुधवार (दि.२८)पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेत मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचीदेखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे. नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने प. सा. नाट्यमंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता सदर व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन २३ वर्षांपासून केले जात असून, यंदाही व्याख्यानमालेसाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. बुधवार, दि. २८ रोजी महाराष्टÑाचे मंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. गुरुवार, दि. २९ रोजी माजी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे ‘महाराष्ट्र आणि देशाची सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान देतील. शुक्रवार, दि. ३० रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे ‘भारताची आर्थिक वाटचाल आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्याध्यक्ष प्रवीण खाबिया, सुनील बुरड, गौतम सुराणा प्रयत्नशील आहेत.