शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

भगुर-राहुरी : ऊसाच्या शेतात भरदिवसा बिबट्याची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 3:34 PM

भरदिवसा बिबट्याने मुक्तपणे संचार केल्याने तो अनेकांच्या नजरेस पडला आणि त्यामुळे अधिक घबराट पसरली.

नाशिक : भगूर-राहुरी शिवारातील मळे भागात रविवारी (दि.२) भरदिवसा बिबट्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात धावाधाव करत दर्शन दिल्याने शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. भगूर भागात पुन्हा बिबट्याचा संचार वाढल्याचे यामुळे अधोरेखित झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने धाव घेत पाहणी करून पिंजरा लावण्याची तजवीज केली.दारणा नदीकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून, या भागातील नाशिक परिक्षेत्रांतर्गतच्या गावांमध्ये अद्याप सात बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. रविवारी संतोष रामदास सानप यांच्या शेतात बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून शेतकºयांना सतर्कता बाळगत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तसेच तत्काळ या भागात शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पिंजरा तैनात करण्यात आला आहे. भरदिवसा बिबट्याने मुक्तपणे संचार केल्याने तो अनेकांच्या नजरेस पडला आणि त्यामुळे अधिक घबराट पसरली. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षितेच्यादृष्टीने वनविभागाने सांगितलेल्या सूचना व उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्या