भगूर पालिकेने लावला थकबाकीधारकांच्या नावाचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:15 IST2021-04-01T04:15:30+5:302021-04-01T04:15:30+5:30
वर्षोनुवर्षे पाणीपट्टी घरपट्टीसह विविध कर भरीतच नसल्याने यावर्षी ५०टक्के घरपट्टी कमी वसूल झाल्याने भगूर नगरपालिकेने मोठ्या रकमेच्या मालमत्ताधारकांच्या ...

भगूर पालिकेने लावला थकबाकीधारकांच्या नावाचा फलक
वर्षोनुवर्षे पाणीपट्टी घरपट्टीसह विविध कर भरीतच नसल्याने यावर्षी ५०टक्के घरपट्टी कमी वसूल झाल्याने भगूर नगरपालिकेने मोठ्या रकमेच्या मालमत्ताधारकांच्या नावांचा फलक तयार करून तो मुख्य शिवाजी महाराज चौकात लावला आहे. हा फलक पाहण्यास मोठी गर्दी होत आहे.
भगूर शहरात १५ हजार लोकसंख्या असून यातील काही राजकीय पक्षांचे नेते मंदिर संस्था, प्रतिष्ठित नागरिक दरवर्षी विविध थकबाकी भरण्यासाठी टाळा टाळ करतात तर नळकनेक्शन तोडून फायदा होत नाही. शिवाय राजकीय दबाव आणला जात असल्याने शेवटी थकबाकीदारांची नावेच सार्वजनिक चौकात लावून नंतर मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सध्या ४० हजारांपासून ०४ हजारापर्यंत थकबाकी न भरणाऱ्याची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
दरम्यान थकबाकीदारानी दखल न घेतल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य अधिकारी प्रतिभा पाटील. मुख्य लिपिक रमेश राठोड यांनी दिला आहे.
चौकट-
चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी संगीता नांदुरीकर यांनी प्रत्येक मालमत्ता थकबाकीदाराच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त घेऊन डोलीबाजा डोलकी संबळ वाजवून लहान मुले नाचवत सक्तीने स्वतः उभे राहून वसुली केली होती.
फोटो :- भगुर शिवाजी महाराज चौकात थकबाकी कर धारकांच्या नावाचा लावलेला फलक.
===Photopath===
310321\31nsk_24_31032021_13.jpg
===Caption===
भगुर शिवाजी महाराज चौकात थकबाकी कर धारकांच्या नावाचा लावलेला फलक.