लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 05:58 PM2019-12-18T17:58:10+5:302019-12-18T17:59:41+5:30

लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे आयोजन करण्यात आले होते.

Bhagalibaba, the adorable deity of the Lasalgaon Panchakroshit, celebrates the death anniversary | लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात

लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात

Next
ठळक मुद्दे परीसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथीनिमित्त मंदीर परीसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पुजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातुन बाबांची प्रतिमा व पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणुकीत लासलगावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, पुरूष व महिला भजनी मंडळ, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीचे रमेश पालवे, जिल्हा परीषद सदस्य डि. के. जगताप, नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, शिवाजी जगताप, बाजार समितीचे सहाय्यक सचिव सुदीन टर्ले यांचेसह कांदा व्यापारी पुरूषोत्तम चोथाणी, ओमप्रकाश राका, दत्तात्रय खुर्दे, प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, संतोष माठा, विलास जगताप, दत्तात्रय खाडे, मनिष सारस्वत, विलास सोनार, अनिल बांगर, वाल्मिक जाधव, सुरेश बोडके, संदीप गोमासे, नाना सुर्यवंशी, बाबा अमरनाथ ग्रुप व श्री गायत्री परीवाराचे सर्व सदस्य, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांचेसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर मिरवणुक भगरीबाबा गावातील प्रमुख मार्गाने नेण्यात आल्या. नंतर समाधी मंदीराजवळ विसर्जीत करण्यात आली. मिरवणुक मार्गावर संपुर्ण गावात गायत्री परीवाराच्या महिलांनी आकर्षक रांगोळी काढुन मिरवणुकीची शोभा वाढवली. यावेळी रघुनाथ महाराज खटाणे, खेडलेझुंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.

पुण्यतिथीनिमित्ताने भगरीबाबा मंदीरात नाशिक रक्तपेढी व रक्तसंक्र मण संशोधन संस्था, नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबीरात ७२ लोकांनी आपले रक्तदान केले.
त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
पुण्यतिथी सोहळा यशस्वीतेसाठी पंकज होळकर, अशोक गायकवाड, सुनिल डचके, दत्तात्रय होळकर, राजेंद्र पाटील, सुरेश विखे, छगन शेलार, कैलास कुºहाडे, सुनिल उपाध्ये, गोरख विसे, ज्ञानेश्वर जगताप, रामदास गायकवाड, गणेश आहेर, सचिन वाघ, लाला ठाकरे, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Bhagalibaba, the adorable deity of the Lasalgaon Panchakroshit, celebrates the death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.