भद्रकालीत जुगाऱ्यांना अटक

By Admin | Updated: October 19, 2015 22:41 IST2015-10-19T22:41:08+5:302015-10-19T22:41:08+5:30

भद्रकालीत जुगाऱ्यांना अटक

Bhadrakaliite gamblers arrested | भद्रकालीत जुगाऱ्यांना अटक

भद्रकालीत जुगाऱ्यांना अटक

नाशिक : भद्रकालीतील गरीब नवाज लॉजच्या भिंतीजवळ जुगार खेळणाऱ्या पाच अट्टल जुगाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोसीन रशीद शेख (२४), इम्रान अकील शेख (२१), कासीम बाबू शेख (४०), मोईन कोकणी (२८) व समीर यादव (१९, सर्व रा. भद्रकाली) हे जुगार खेळत होते. त्यांच्याकडून एक हजार दोनशे रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bhadrakaliite gamblers arrested