शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:32 IST

जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो.

ठळक मुद्देमहिला भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारयंदाचा ३८९वा उरूस जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून बडी दर्गाचा नावलौकिक

नाशिक : जुने नाशिकमधील सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गा आज संध्याकाळपासून गजबजणार आहे. भाविकांची अलोट गर्दी येथे पुढील बारा दिवस उसळलेली पहावयास मिळणार आहे. निमित्त आहे, वार्षिक यात्रोत्सव अर्थात उरूसाचे.नाशिकमधील जुने नाशिक परिसरातील पिंजारघाट रस्त्यावर असलेला बडी दर्गा जातीय सलोखा व राष्टÑीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सर्वधर्मीय भाविक मनोभावे यात्रेत सहभागी होऊन वार्षिक यात्रोत्सवात सहभागी होतात. दरवर्षी यात्रोत्सव मे महिन्यात साजरा होतो; मात्र यंदा शालेय सुटी लवकर लागल्याने यात्रा एप्रिलमध्येच सुरू झाली आहे.जुने नाशिकमधील पिंजारघाट परिसरात बडी दर्गा असून दरवर्षी दर्ग्याच्या आवारात यात्रोत्सव भरविण्याची पारंपरिक प्रथा आहे. यंदाचा उरूस ३८९वा असल्याची माहिती हाजी वसीम पीरजादा यांनी दिली आहे. या उरूसमधील ‘फालुदा’ या शीतपेयाचे विशेष आकर्षण असते. जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो.  जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून बडी दर्गाचा नावलौकिक आहे. यात्रोत्सवानिमित्त बडी दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

चोख पोलीस बंदोबस्तयात्रेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार असून साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा यात्रोत्सव पुढील बारा दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद चौकातून पुढे पिंजारघाट मार्गावर चारचाकी वाहनांसह रिक्षांना प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुठल्याहीप्रकारची संशयित व्यक्ती अथवा बेवारस वस्तू दर्ग्याच्या परिसरात यात्रेत आढळून आल्यास भाविकांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.भद्रकाली पोलिसांकडून मानाची प्रथम चादरआज संध्याकाळी पारंपरिक प्रथेनुसार पोलीस आयुक्तालय व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने चादरची मिरवणूक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातून पारंपरिक प्रथेनुसार मीलादने हुसेनी बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त चादरची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत पोलीस आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरिक्षकांसह शांततासमितीचे सदस्य सहभागी होणार आहे. दरवर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी पोलिसांना प्रथम चादर अर्पण करण्याचा मान दिला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते.महिला भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारबडी दर्गामध्ये यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लोटणार असून खबरदारीचा उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच वर्षाचे बारामाही महिलांकरिता दर्ग्यात प्रवेशाचा स्वतंत्र मार्ग आहे; मात्र यात्रेनिमित्त या प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वारावर कुठल्याहीप्रकारे विक्रेत्यांचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरून महिला भाविकांना दर्ग्यात प्रवेश करताना अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही. पाणपोईच्या शेजारून प्रवेशाचा मार्ग देण्यात आला आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक