शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय अखेर भाभानगरला
By Admin | Updated: May 17, 2017 18:18 IST2017-05-17T18:18:27+5:302017-05-17T18:18:27+5:30
आजच्या महासभेत फेरप्रस्ताव : वडाळा येथील जागेचा हट्ट आमदारांनी सोडला

शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय अखेर भाभानगरला
नाशिक : महाराष्ट्र शासनामार्फत नाशकात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी अखेर भाभानगर येथील सार्वजनिक उपक्रमांसाठी आरक्षित असलेली दहा हजार चौरस मीटरची जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या मागणीनुसार, सदर जागा शासनाकडे हस्तांतरित करण्याकरिता गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या महासभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यापूर्वी, आमदारांनी वडाळा शिवारातील जागेचा हट्ट धरला होता; परंतु तत्कालीन स्थानिक नगरसेवक संजय चव्हाण यांनी त्यास कडाडून विरोध दर्शविल्याने दोन वेळा प्रस्ताव बाजूला पडला होता. आता महापालिकेत भाजपाचीच सत्ता असल्याने सदर रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.