शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

कोयत्याने निघृण खून : भांडण सोडविण्यास गेला अन् प्राणाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:30 IST

जेलरोड परिसरातील चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्यामधील काही संशयितांनी कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देगोरेवाडी भागात दंगल नियंत्रण पथक पाचारण संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हाशहराची कायदासुव्यवस्था धोक्यात दर पंधरवड्याला शहरात खून राजरोसपणे टोळके सशस्त्र फिरत असल्याने संताप

नाशिक : शहराची कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून दर पंधरवड्याला शहरात खूनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. राजरोसपणे टोळके शहरात सशस्त्र फिरत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. जेलरोड परिसरातील चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्यामधील काही संशयितांनी कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याचा मित्र रितेश विनायक पांडव व अल्केश राजू जॉन यांच्यावरही प्राणघातक हल्ला संशयितांनी केला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंपानगरी जेलरोड परिसरात रोहित हा अत्याबहीणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी रविवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आला होता. रोहित हा सुभाषरोडवरील रहिवासी आहे. यावेळी संशयित रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललीत वागळे, मयुर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशिष वाघमारे आदिंनी चंपानगरी उद्यानाच्या जवळ येत आपआपसांत भांडण सुरू केले. येथून जवळत रोहितच्या आत्याबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे रोहित, रितेश, अल्केश हे तीघे त्यांना समजावण्यासाठी गेले. ‘येथे भांडण करु नका, हळदीचा कार्यक्रम आहे’ असे सांगितल्यानंतर संशयितांपैकी रोहित पारखे, करण केदारे यांनी या तीघा मीत्रांवर सशस्त्र हल्ला चढविला. कोयत्याने रोहितच्या छातीवर वर्मी घाव लागला तर रितेश, अल्केश यांनाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. दरम्यान, या तीघांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान रोहित वाघ याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. उर्वरित दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत सर्व संशयित फरार झाले होते. तत्काळ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अकरा संशयितांपैकी सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. अविनाश विष्णू वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गोरेवाडी भागात दंगल नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले आहे. या भागातील संशयित हल्लेखोर असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोरेवाडी परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. मयत वाघ हा सुभाषरोडवरील रहिवासी होता त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांनी त्याच्या खूनाच्या घटनेनंतर व्यवसाय बंद ठेवला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनCrime Newsगुन्हेगारी