पावसाळ्यात सापांपासून रहा सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:53+5:302021-06-17T04:10:53+5:30
पावसाळ्यात घरात साप शिरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक विषारी साप आढळत असले तरी जिल्ह्यात आढळणाऱ्या ...

पावसाळ्यात सापांपासून रहा सावध
पावसाळ्यात घरात साप शिरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अनेक विषारी साप आढळत असले तरी जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या विविध जातींपैकी निमविषारी सापांची जास्त संख्या आहे. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास व मनात भीती न बाळगल्यास सर्पदंश झाल्यावरदेखील योग्य उपचारामुळे व माहितीमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात.
नाशिक जिल्ह्यात आढळणाऱ्या
सापांमध्ये केवळ ६ साप हे विषारी आहेत. त्यात नाग, घोणस, मण्यार, पोवळा यांचा समावेश आहे. विषारी सर्पदंश झालाच तरी सर्पदंशावर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार केल्यास व काही वेळात संबंधिताला रुग्णालयापर्यंत पोहोचवून उपचार मिळाल्यास विषारी सापाचा दंश असला तरी रुग्ण बचावू शकतो. अंधश्रद्धेपासून नागरिकांनी दूर राहत सर्पदंश झाल्यावर संबंधितावर वेळेत उपचार करणे आवश्यक असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इन्फो
पावसाळ्यातच का आढळतात साप?
पावसाळ्याचे सुरुवातीचे काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. उन्हाळ्यात खूप ऊन पडल्यामुळे साप हे थंड आणि दमट जागा शोधतात. त्यामुळे साप हे मानवी वस्तीत भक्ष्य आणि आसरा शोधण्यासाठी येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ सुरू होत असतो. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन ते तीन सापदेखील आढळतात.