शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सावधान...मदतीसाठी पुढे आलेला हात दुचाकीचोराचाही असू शकतो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:59 PM

नाशिक : मोपेड दुचाकी अचानकपणे एअर धरते अन् बंद पडते ही समस्या सर्वसामान्यपणे अधिक जाणवते अशावेळी महिलांची व ज्येष्ठांची ...

ठळक मुद्देचोरटा सीसीटीव्हीत कैदसुशिक्षिताप्रमाणे पोशाख परिधान करून टेहळणी दुचाकी ‘स्टार्ट’ करून थेट पोबारा

नाशिक : मोपेड दुचाकी अचानकपणे एअर धरते अन् बंद पडते ही समस्या सर्वसामान्यपणे अधिक जाणवते अशावेळी महिलांची व ज्येष्ठांची अधिक दमछाक होते.तसेच वाहनतळात उभी केलेली दुचाकी वाहनांच्या गराड्यातून बाहेर काढतानादेखील महिलांची अडचण निर्माण होते. याप्रसंगी महिलांना मदतीच्या बहाण्यासाठी काही पुरूष पुढे येतात. त्याचाच फायदा आता चोरटेदेखील घेत असून मदतीच्या बहाण्याने चक्क दुचाकी ताबा मिळवून भामटे फरार होत असल्याचे काही घटनांमुळे समोर आले आहे. त्यामुळे मदत घेताना सावधगिरी बाळगणे दुचाकीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे झाले आहे.शहर व परिसरात दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्याही ठोकल्या जातात व विविध गुन्हे उघडकीस आणले जातात; मात्र तरीही दुचाकी चोरीचे सत्र थांबलेले नाही. सण-उत्सवांच्या काळात अशा घटनांमध्ये अधिकच वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. दोन दिवसांपुर्वी नवीन मध्यवर्ती बसस्थानकात काही कामानिमित्त आलेल्या प्रतीक्षा प्रवीणकुमारजी संचेती या युवतीने आपली अ‍ॅक्टिवा दुचाकी (एम.एच.१५ डीक्यू ०८८७) रस्त्यालगत असलेल्या वाहनतळात उभी केली. बसस्थानकातून चौकशी करून ही युवती बाहेर आली तेव्हा तिच्या दुचाकीभोवती अन्य वाहनांचा गराडा पडलेला होता. त्यामुळे दुचाकी काढणे तिला अशक्य झाले. तिच्या अडचणीचा फायदा वाहनतळात टेहळणी करत असलेल्या एका दुचाकीचोराने घेतला. मदतीच्या बहाण्याने तो भामटा पुढे आला आणि त्याने संचेती यांच्याकडून दुचाकीची किल्ली मागितली. दुचाकी वाहनांच्या गराड्यातून रस्त्यावर काढली आणि ‘स्टार्ट’ करून थेट पोबारा केला. क्षणार्धात डोळ्यांदेखत दुचाकी चोरी झाल्याचे बघून संचेती यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविली.चोरटा सीसीटीव्हीत कैदघटनास्थळी पोलीस दाखल झाले. वाहनतळाशेजारी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्या चोरटा एखाद्या सुशिक्षिताप्रमाणे पोशाख परिधान करून टेहळणी करत असल्याचे आढळले. संचेती यांनीही त्यास ओळखले. सीसीटीव्ही फूटेजच्या अधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेलाही पुरविण्यात आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार गुंजाळ पुढील तपासाला गती देत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSmart Cityस्मार्ट सिटीtheftचोरीbikeबाईकWomenमहिला