‘या ही वळणावर’ची बाजी

By Admin | Updated: December 7, 2015 23:54 IST2015-12-07T23:53:27+5:302015-12-07T23:54:34+5:30

राज्य नाट्य : ‘लोकहितवादी’चे सलग यश; ‘माय डिअर शुबी’ द्वितीय, ‘या वळणावर’ तिसरे

The bet on 'this turnover' | ‘या ही वळणावर’ची बाजी

‘या ही वळणावर’ची बाजी

नाशिक : येथील लोकहितवादी मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत अंतिम फेरीत स्थान मिळवले. ‘लोकहितवादी’च्या ‘या ही वळणावर’ या नाटकाला दहा हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. याशिवाय अन्य पाच पारितोषिकेही या नाटकाने खिशात टाकली. आर. एम. ग्रुपच्या ‘माय डिअर शुबी’ने द्वितीय (सात हजार), तर ‘मेनली अमॅच्युअर्स’च्या ‘या वळणावर’ने तृतीय क्रमांक (पाच हजार) पटकावला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर यादरम्यान पार पडली. स्पर्धेत नाशिक व धुळ्याची मिळून एकूण २१ नाटके सादर झाली होती. स्पर्धेचे परीक्षण देवेंद्र यादव (मुंबई), शमा सराफ (जळगाव) व श्रीकांत पाठक (इचलकरंजी) यांनी केले.
स्पर्धेची अन्य पारितोषिके अशी :
दिग्दर्शन : प्रथम : हेमंत देशपांडे (या ही वळणावर), द्वितीय : प्रशांत हिरे (माय डिअर शुबी)
प्रकाशयोजना : प्रथम : प्रबोध हिंगणे (या ही वळणावर), द्वितीय : रवि रहाणे (माय डिअर शुबी)
नेपथ्य : प्रथम : किरण समेळ (या ही वळणावर), द्वितीय : शैलेंद्र गौतम (हयवदन)
रंगभूषा : प्रथम : माणिक कानडे (हयवदन), द्वितीय : सुजय भालेराव (फुटपाथ)

अभिनयाची पारितोषिके

महेश डोकफोडे (या वळणावर) व लक्ष्मी पिंपळे (माय डिअर शुबी) यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक जाहीर झाले, तर माधवी जाधव (या वळणावर), प्रिया सातपुते (हयवदन), पल्लवी पटवर्धन (अखेरची रात्र), रसिक पुंड (या ही वळणावर), शीतल थोरात (फुटपाथ), नरेंद्र दाते (या ही वळणावर), शौनक गायधनी (हू इज डेड), सचिन रहाणे (नट नावाचे नाटक), विशाल रूपवते (बायको पाहावी सांभाळून), भाऊसाहेब साळवी (अरण्यभूल) यांनी अभिनय प्रमाणपत्रे पटकावली.

पहिलाच प्रयत्न

सलग दुसऱ्या वर्षी यश मिळाल्याने आनंद झाला आहे. राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न होता. हे नाटक पेलणे आव्हान होते. नाटकाचा प्रत्येक प्रयोग काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे अंतिम फेरीत नाटक सादर करताना योग्य ते बदल केले जातील.
- हेमंत देशपांडे,दिग्दर्शक, या ही वळणावर

कमी पडलो
आम्ही अभिनय, दिग्दर्शनात कोठेतरी कमी पडलो, असेच म्हणावे लागेल. कारण आम्हाला प्रथम क्रमांकाचीच अपेक्षा होती. स्पर्धेतील सर्व नाटके रसिकांनी पाहिलेली आहेत. त्यांच्यासाठीही हा एकप्रकारचा धक्काच आहे. दरवर्षीच असे घडत असल्याने आता सवय झाली आहे.
- प्रशांत हिरे, अभिनेते, दिग्दर्शक, माय डिअर शुबी

स्वप्न पूर्ण
स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते, हे नाटकात दाखवलेच होते. चांगल्या प्रयत्नांना यश आले. गेल्या वर्षी या नाटकाला पारितोषिक मिळाले नाही, त्याची कारणे वेगळी होती. त्यानंतर संहिता व सादरीकरणात किरकोळ बदल केले. स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
- महेश डोकफोडे,अभिनेते, या वळणावर

Web Title: The bet on 'this turnover'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.